बापरे : पत्नी आहे की वैरीन, खून करुन पतीचा मृतदेह जेसीबीने खड्डा खणून गाडला

wife murdered her husband and with help of JCB the murdered disposal in nipani
wife murdered her husband and with help of JCB the murdered disposal in nipani
Updated on: 

कोगनोळी (निपाणी) : वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पतीचा हंचिनाळ (निपाणी) येथे पत्नीने आपल्या माहेरी खून करून मृतदेह खड्डा खणून गाडल्याची घटना शनिवारी (5) उघडकीस आली. सचिन सदाशिव भोपळे (वय ४५, मुळगाव गडहिंग्लज, सध्या रा. गोकुळ शिरगाव एमआयडीसी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी अनिता हिच्यासह चार जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन व अनिता भोपळे हे पती-पत्नी गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्यास होते. पत्नी अनिता ही औद्योगिक वसाहतीत काम करत होती. पती सचिन हा अनिताला वारंवार चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत होता. वारंवार होणारी भांडणे मिटवण्यासाठी बुधवारी  (२) हे दाम्पत्य हंचिनाळ येथे आले. त्या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री सचिन व अनिताचे जोरात भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले.

रागाने अनिताने सचिनच्या डोक्यात जोराचा वार केला. त्यात सचिन खाली कोसळला. अनिताचा भाऊ कृष्णात राजाराम घाटगे (वय 35, रा. हंचिनाळ), बहीण वनिता व नातलग गजानन आप्पा रेडेकर (वय 20) यांनी सचिनचे हात पाय धरले. अनिता हिने सचिनचा गळा दाबून खून केला असल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी दिली. त्यानंतर गुरुवारी (३) पहाटे सुनील दादासो राठोड (वय 27) या जेसीबी चालकाला फोन करून म्हैस मेली असून खड्डा काढायचा आहे, असे सांगून बोलवून घेतले. जेसीबीच्या साह्याने खड्डा काढून झाल्यानंतर सुनीलला चहा पिण्यासाठी घरी नेले. याच दरम्यान घरातील उपस्थितांच्या मदतीने सचिनचा मृतदेह सदर खड्ड्यात घालून थोडी माती घातली. 

जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित खड्डा बुजवून घेतला. काहीतरी गडबड असल्याचे जेसीबी चालकाच्या  लक्षात आले. सकाळी सदर घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य बबन हवलदार यांच्या कानावर घातली.  दोघांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्ष बी. एस. तळवार यांना ही प्रकार सांगितला.  
मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रांताधिकारी युकेश कुमार, प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक दिपन एम. एन., तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक, पोलिस उपनिरीक्षक बी. एस. तळवार, एएसआय एस. ए. टोलगी, कंबार व अन्य पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून आज पंचनामा केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक तळवार यांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

चिमुरड्या मुलावर वाईट प्रसंग

सचिन आणि अनिता या दांपत्याला प्रज्वल नावाचा सात वर्षाचा मुलगा आहे. सचिनचा खून झाला असून अनिता हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे चिमुरड्या प्रज्वलवर वाईट प्रसंग आल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. 

दिवसभर घटनास्थळी गर्दी 

जेसीबीच्या सहाय्याने काहीतरी गाडल्याची माहिती परिसरात पसरली होती. त्यामुळे कालपासून चर्चा रंगली होती. आज
दिवसभर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Opposition leaders prepare for a protest march against the government’s decision on Gokul Dairy in Kolhapur
Gokul Milk Union five nominated directors ordinance
Kolhapur Municipal Corporation approves outsourcing of employees to address staff shortages across departments.
Satej Patil statement on Gokul chairman election